बीचवर बिकीनी नाही तर काय साडी नेसू का?

मुंबई | “बीचवर बिकीनी नाही तर आता साडी नेसू का?” असा सवाल मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या ट्रोलर्सला विचारलाय. ‘पॅडमॅन’नंतर अभिनेत्री राधिका आपटे हे नाव बरेच चर्चेत आहे आणि तिला ट्रोलही केलं जातंय.

राधिका गेल्या आठवड्यात गोव्याला गेली होती. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावरील बिकीनीतला फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. मात्र राधिकानेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

“सोशल मीडियावर मला ट्रोल केलं जात आहे. हे माझ्यासाठी हास्यास्पद आहे. आता बीचवर बिकीनी सोडून साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का?”, असा सवाल राधिकानं आपल्या पोस्टमध्ये विचारलाय. 

#holiDay #timeoff #goa #sea #sunset #friends @marc_t_richardson #afteraswim

A post shared by Radhika (@radhikaofficial) on