Top News

नरेंद्र मोदींना तुरुंगात टाकलं पाहिजे- राहुल गांधी

नवी दिल्ली | राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच घेरलं आहे. राफेल प्रकरणात मोदींनी स्पष्टपणे दलाली केली आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

मोदींनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडली आहे. सरंक्षण कराराबाबतच्या गोपनीयतेचा भंग त्यांच्याकडून झाला आहे, त्यामुळे ते यामुद्यावरुन तुरुंगात जाऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

राफेल कराराच्या 10 दिवस आधीच अनिल अंबानींना यासंदर्भात माहिती कशी मिळाली. मोदींनी याबाबतचं उत्तर द्यावं, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधकांची काय चौकशी करायची आहे ती करा. पण राफेल प्रकरणाचीही चौकशी करा, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

निवडणूकीआधी 5 कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा संकल्प

-मोदींनीच अनिल अंबानींना राफेल कराराची माहिती दिली- राहुल गांधी

पवार कुटुंबातील 4 सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं

-मोदींच्या उपस्थितीत मंत्र्याने महिलेला ‘नको’ तिथे लावला हाथ

-MPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा घोटाळा; काँग्रेसचा सनसनाटी आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या