…आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अडवाणींना हात दिला!

Photo- LoksabhaTV Screengrab

नवी दिल्ली | संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राहुल गांधींनी पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकून घेतली. राष्ट्रपतींचं अभिभाषण संपल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी जेव्हा जायला उठले तेव्हा राहुल गांधींनी पुढे होत त्यांना हात दिला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतीचं अभिभाषण पार पडलं. यावेळी एकमेकांविषयीची कटुता विसरुन सर्व राजकीय नेते एकमेकांची ख्याली-खुशाली विचारताना दिसले. 

दरम्यान, लालकृष्ण अडवाणी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये निरंतर संवाद सुरु असलेला पहायला मिळाला. यावेळी संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांनी सोनियांशी काही काळ चर्चा केली.