
नवी दिल्ली | उद्योगपती अनिल अंबानींना 30 हजार कोटी रुपये देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी राफेल करार केला असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकार विरोधात राफेल करारावरून राहुल गांधी आक्रमक झाले आहेत.
राफेल कराराबाबत कॅगचा अहवाल राज्यसभेत ठेवल्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
कॅगच्या अहवालात सरकारनं दिलेल्या आकडेवारीपेक्षा तफावत आढळून आली, हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
दरम्यान, जुन्या राफेल करारात बँक हमी आणि गुणवत्तेची हमी होती ती नव्या करारात नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–प्रितम मुंडेंच्या विरोधात अमरसिंह पंडित निवडणूक लढणार??
–युतीच्या चर्चेसाठी गडकरी, शहा ‘मातोश्री’चा उंबरा ओलांडणार?, हालचालींना वेग
–नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत; मुलायम सिंग यादवांनी दिल्या शुभेच्छा
–मला तुमची लाज वाटते, प्रकाश राज यांची अमित शहांवर सटकली
–राष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार?