देश

बेटी बचाओ नाही तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’ हीच भाजपची घोषणा- राहुल गांधी

नवी दिल्ली | हाथरस बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून काँग्रस खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशातील जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची दडपशाही सुरू आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

कधी त्यांनी जिवंत असताना सन्मान दिला नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार दिला नाही. बेटी बचाओ नाही तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’ हीच भाजपाची घोषणा आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली.

 

महत्वाच्या बातम्या-

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण!

या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे- खासदार संभाजीराजे

मराठा आरक्षणाच्या लढ्यात आता पार्थ पवारांची उडी, आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार!

“माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या