देश

शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत- राहुल गांधी

नवी दिल्ली | दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

तीन-चार कुडमुडय़ा भांडवलदारांच्या आधारे मोदी देश चालवत असून त्यांच्यासाठी पैसे उभे करण्यात गुंतलेले आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

कोणतीही चर्चा न करता संमत केलेले कायदे रद्द झाले पाहिजेत. अन्यथा दिल्लीच्या सीमांवरील आंदोलक शेतकरी मागे फिरणार नाहीत. ते वैतागून, त्रासून घरी जातील असे मोदींना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम असेल, असं राहुल गांधी म्हणाले.

शेतकरी कडाक्याची थंडी, त्रास, कष्ट, वेदना सहन करत आहेत. पंतप्रधानांनी त्यांचं म्हणणं ऐकावं. अवघा देश पाहात आहे. या शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर कोणी उभे राहू शकणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”

कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही- आनंद दवे

“राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नाहीत, त्यांच्यात हे सत्य स्वीकारण्याचं धाडस नाही”

“निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात”

ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या