देश

‘….तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो’; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

नवी दिल्ली | खासदार राहुल गांधी यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना अद्यापही ताब्यात ठेवण्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून लोकशाहीला तडा गेला असल्याचं म्हटलं आहे.

ईदच्या आदल्या दिवशी आणि कारवाई करुन जवळपास वर्ष झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना ताब्यात ठेवण्याचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

जेव्हा केंद्र सरकार बेकायदेशीपणे राजकीय नेत्यांना ताब्यात घेतं तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो. मेहबुबा मुफ्ती यांची सुटका केली गेली पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याआधी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनीही मेहबुबा मुफ्ती यांची सुटका न करण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. हा कायद्याचा गैरवापर असून देशातील प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक हक्कांवर करण्यात आलेला हल्ला असल्याची टीका त्यांनी केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही- जितेंद्र आव्हाड

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; अंकिता लोखंडेने सोडलं मौन

अभिनेता आफताब शिवदासानी झाला ‘बाप’माणूस!

पुणे विभागीय आयुक्तपदी सौरव राव यांची नियुक्ती

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या