प्रजासत्ताक दिनी सरकारकडून काँग्रेस अध्यक्षांचा अपमान?

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सत्ताधारी भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. 

अहंकारी सरकारने राहुल गांधी यांना पहिल्यांदा चौथ्या रांगेत आणि नंतर सहाव्या रांगेत बसवलं, असं या ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच आम्हाला संविधानाचा उत्सव सर्वात आधी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

दरम्यान, भाजपकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका व्यक्त करण्यात आलेली नाही, मात्र या प्रकारामुळे काँग्रेसमधील नेते तसेच कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करण्यास सुरुवात केलीय.