घटना बदलण्यासाठी भाजपकडून गुपचूप कारस्थानं- राहुल

नवी दिल्ली | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला भाजपकडून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजपकडून गुपचूप कारस्थानं सुरु आहेत, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. 

काँग्रेसच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत त्यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या टीकेचे मुख्य लक्ष्य होते. 

राजकीय फायद्यासाठी आज आपल्या देशासोबत धोकेबाजी केली जात आहे. आपण चांगलं काम केलं नसेल निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू मात्र सत्याची कास सोडता कामा नये, असं राहुल यांनी म्हटलंय.