मोदींना मिठी मारा, दावोसमध्ये दिसा आणि १२ हजार कोटी लुटा!

नवी दिल्ली | पीएनबी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. 

नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दावोसमध्ये दिसले होते, असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. भारताला कसं लुटायचं हे नीरव मोदीनं दाखवून दिलंय असं राहुल यांनी म्हटलंय. 

सर्वात आधी नरेंद्र मोदींना मिठी मारा, दावोसमध्ये त्यांच्यासोबत दिसा आणि त्यानंतर 12 हजार कोटी रुपये लाटा आणि मल्ल्याप्रमाणे देश सोडून पळून जा, असं राहुल यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.