बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या मग भागवतांच्या का नाही?”

नवी दिल्ली | देशातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्यांवरून चांगलाच तापत आहे. बुधवारी काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महिला काॅंग्रेस स्थापना दिवस पार पाडला. यावेळी राहुल गांधी यांनी देशातील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधला.

जेव्हा आपण महात्मा गांधीचा फोटो पाहतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या फोटोमध्ये आजुबाजूला 2 ते 3 महिला दिसतील, परंतु आपण कधी मोहन भागवत यांचा एखादा महिलेसोबत फोटो पाहिला आहे का? कारण त्यांची संघटना महिलांना दडपण्याचं काम करते आणि आमचा पक्ष त्यांना व्यासपीठ देत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हणाले.

भाजप आणि संघ देशात पुढे येऊ देत नाही, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आज पर्यंत एकाही महिलेला पंतप्रधान केलं नाही आहे.  भाजप सरकारने लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढलं आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे यांसारखी समाजविरोधी धोरण राबवून या सरकारने लक्ष्मीची संपूर्ण शक्ती आपल्या चार-पाच लोकांच्या हाती सोपवली आहे, अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, अलिकडेच राहुल गांधी यांनी जम्मूच्या त्रिकुटा नगर येथे कार्यकर्त्यांशी सवांद साधला होता. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. मोदी सरकारने आखलेल्या धोरणामुळे देशातील दूर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे, असंही राहुल गांधी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या किरीट सोमय्यांवरच गंभीर आरोप

विदर्भातील काँग्रेस मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या; सोमय्यांच्या रडारवर आता कोण?

जनता भोळी जरूर आहे पण मुर्ख नाही – चंद्रकांत पाटील

आरसीबीचा ‘वाघ’ एबी डिव्हिलियर्सचं वादळी शतक, गोलंदाजांना भरणार धडकी, पाहा व्हिडीओ

महात्मा गांधींना RSSच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या?- राहुल गांधी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More