नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेले कित्येक दिवस शेतकरी आंदोलन चालू आहे. राजधानीमध्ये प्रत्येक राज्यातून शेतकरी एकत्र आले असून कृषी कायदे मागे घेण्यासाठी कडाक्याच्या थंडीत सरकारविरोधात त्यांनी आंदोलन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधत एक पोल सुरू केला आहे.
या पोलमध्ये, पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत कारण… असं म्हणत गांधीनी चार पर्याय दिले आहेत. त्यामधील पहिला असा की, पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी आहेत, दुसऱ्या पर्यायामध्ये मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहे, हे दोन पर्याय आहेत.
तिसऱ्या पर्यायामध्ये मोदी हट्टी आहेत तर चौथा पर्याया असा की वरील सर्व. राहुल गांधींच्या या ट्विटर पोलला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, राहुल गांधीच्या या पोलवर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Mr Modi is refusing to repeal the anti-farmer laws because he is:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 30, 2020
थोडक्यात बातम्या-
…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले!
डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येबद्दल पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर
भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही- शरद पवार
मोठी बातमी! आयटी रिर्टन’बाबत केंद्र सरकारने केली मोठी घोषणा