सोलापुर | सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या मैदानावर सभा घेऊन सुशीलकुमार शिंदेंना लक्ष्य केलं होतं त्याच मैदानावर राहुल गांधी 13 फेब्रुवारी रोजी सभा घेणार आहेत.
काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत एक पाऊल पुढं टाकत सोलापुरच्या जागेसाठी देशाचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव घोषित केलंय. त्यांच्याच प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राहुल गांधी सोलापुरात येणार आहेत.
प्रियांका गांधीचीही पहिली सभा महाराष्ट्रातल्या नंदुरबार येथे व्हावी म्हणून काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील सोलापुरात सभेसाठी येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–‘कॅप्टन कूल’ला बाद केल्याशिवाय उद्याचा सामना जिंकणं कठीण- न्यूझीलंड
-काँग्रेसची मोठी घोषणा, सोलापुरातून ‘हा’ नेता लोकसभेच्या रिंगणात!
–मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेक महिला, मुलं जखमी
–…आणि शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात घेतला उखाणा!
–पैसे तयार ठेवा! डेल स्टेनची भारताचा प्रशिक्षक होण्याची तयारी
Comments are closed.