नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणादरम्यान कविता केली.
आठवलेंच्या कवितेमूळे संसदेत एकच हशा पिकला. आठवलेंनी त्यांच्या कवितेतून मोदींचं तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधकांवर टिका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आठवलेंनी भाषण केलं. त्यांच्या या कवितायुक्त भाषणामुळे संसदेत हास्याचे कारंजे उडाले. विशेष बाब म्हणजे आठवलेंची कविता ऐकून मोदींनाही हसू आवरले नाही.
दरम्यान, राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल, असं आठवले यांनी म्हणताच सभागृहात तुफान हशा पिकला.
Ramdas Athawale 😂😂🙌😍😭😂#ModiUnstoppable pic.twitter.com/YlAt01Ua4a
— Chowkidar Hardik (@Humor_Silly) February 7, 2019
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसचा ‘उमेदवारी पॅटर्न’ अशोक चव्हाणांनी सांगितला, म्हणाले…!
–आलाय तर संसदेत हजेरी लावून या; पवारांचा उदयनराजेंना सल्ला!
–पायाखालची जमीन सरकल्यानंच ‘त्यांनी’ हे मत मांडलं- देवेंद्र फडणवीस
–राष्ट्रवादी म्हणते, युतीसाठी भाजप-शिवसेना रोज एकमेकांना प्रपोज करते!
–विंक सिननंतर आता प्रिया वारियरचा ‘Kissing Scene’ व्हायरल!