देश

जनतेच्या स्वप्नांचा चुराडा केला, जल्लोष कसला करता?- राहुल गांधी

नवी दिल्ली | जनतेच्या स्वप्नांचा चुराडा आणि अकार्यक्षमता यापलिकडे तुमचं कर्तृत्व काय, त्यामुळे जल्लोष कसला करताय? असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारलाय. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपे देशभरात जल्लोष करण्यात येणार आहे, त्यावर राहुल गांधी यांनी हा सवाल केलाय.

तुमच्या राज्यात युवकांना रोजगार नाही, शेतकरी आत्महत्या करतो आणि जवानांचे जीव जात आहेत, असंही राहुल यांनी म्हटलंय.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या