बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळं अभिनेत्याचा मृत्यू, मृत्यूपूर्वी लिहिलेली धक्कादायक पोस्ट व्हायरल

मुंबई | कोरोनाने देशभरात सध्या थैमान घातलं आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही रूग्णांना वेळेवर ऑक्सिजन किंवा योग्य ते उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे. अशाच प्रकारे बॉलिवुडमधील अभिनेता आणि थिअटर आर्टिस्ट राहुल वोहराचं कोरोनाने निधन झालं आहे.

राहुलच्या मृत्युबाबत दिग्दर्शक आणि थिअटर गुरू अरविंद गौर यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली. राहुल वोहरा मागील काही दिवसांपासून कोरोनाशी लढत होता. मात्र त्याचा रविवारी मृत्यु झाला. राहुल मरण्याअगोदर फेसबुकवरून पोस्ट करत चांगल्या उपचारासाठी त्याने विनंती केली होती. राहुलती ती पोस्ट वाचून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. तुमचा राहुल वोहरा. त्यापुढे म्हटलंय की, लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन आता हिंमत हरलो असल्याचं राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  राहुलने कोरोनाशी लढताना ही मदतीची मागणी करणारी पोस्ट केली होती.

दरम्यान, राहुल वोहरा निघून गेले. एक चांगला अभिनेता आता राहिला नाही. कालच राहुलने सांगितलं होतं. मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. शनिवारी रात्रीच राहुल वोहराला राजीव गांधी हॉस्पिटलमधून द्वारका येथील आयुष्मान इथे उपचारासाठी पाठवलं होतं. राहुल तुला आम्ही वाचवू शकलो नाही, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत,  असं अरविंद गौर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

बीडमधे पडला असला पाऊस, पाण्याचा लोंढा पाहून अचंबित व्हाल

कोवॅक्सिन ही 12 वर्षांवरील मुलांना देण्यास मान्यता मिळाल्याच्या व्हायरल मेसेज मागचं सत्य वाचा

‘उगाच कुणाच्या घरी जाऊ नका, त्यांच्याशी….’; गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला

देशातील 3 राज्यांमध्ये मागच्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

‘स्तनपानाला अजुनही आपल्याकडे…’; मातृदिनानिमित्त अमृता रावने व्यक्त केली खंत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More