बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गतवर्षीचा वचपा काढण्यासाठी राहुलची ‘पंजाब किंग्ज’ तयार

मुंबई | आयपीएलचा चौथा सामना सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्स आणि केएल राहुलचा संघ पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघात एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज आहेत. त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा चौकर आणि षटकार यांची आतषबाजी पाहायला मिळू शकते.

मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे सामने दुबईत भरवले गेले होते. त्यावेळी राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात 2 सामने झाले होते. या दोन्ही सामन्यात राजस्थानने पंजाबला धूळ चारत विजय मिळवला होता. पंजाब विरुद्ध राहुल तेवतियाने एकाच षटकात 5 षटकार टाकत सामना फिरवला होता. त्यानंतर राहुल तेवतियाला चांगलाच सूर गवसला.

मागील वर्षी चांगली कामगिरी न झाल्याने स्टीवन स्मिथला कर्णधार पदावरून तसेच संघातून देखील बाहेर काढले होते. त्यानंतर आता संघाची जबाबदारी युवा खांद्यावर देण्यात आली आहे. संजू सॅमसन याच्यावर कर्णधारपद सोपवलं गेलं आहे. तर दुसरीकडे मागील वर्षी चांगली कामगिरी करून पंजाबच्या संघाने सर्वांची मनं जिंकली होती. कर्णधार केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

दरम्यान, मोहम्मद शमी आणि ख्रिस मॉरिस या दोन्ही गोलंदाजांकडून पंजाबला मोठी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी पंजाबला चांगली कामगिरी करून देखील नेट पॉइंट्सच्या आधारावर प्ले-ऑफमध्ये खेळायची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे या वर्षी सुरुवातीपासून संघाला चांगली कामगिरी करावी लागेल.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार यांच्यावरची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी; नवाब मलिक यांनी दिली माहिती

‘2 दिवसांनी लाॅकडाऊन लागणार आहे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं व्यापाऱ्यांना महत्वाचं आवाहन

“तुमच्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही”

मोराच्या फार जवळ जाणं अंगलट, ‘या’ अभिनेत्रीच्या थेट अंगावरच मारली उडी!

“आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More