बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र अनलॉक मात्र ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; एका दिवसात आढळले तब्बल 695 रुग्ण

रायगड | महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार माजला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. पण रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला.

रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 695 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आल्याने महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

एकीकडे महाराष्ट्र अनलॉक होत असताना रायगड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आल्याने प्रशासनासह नागरिकांच्याही चिंतेत भर पडली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात 128 म्हणजेच जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच दिवसभरात तब्बल 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असताना पाहायला मिळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 44 हजार 375 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सध्या 5 हजार 885 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

थोडक्यात बातम्या –

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; ‘या’ 7 जिल्ह्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही

“काँग्रेसने ‘ते’ काम केलं म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला”

‘या’ दिवशी लाॅन्च होणार गुगल आणि जीयोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More