बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने वसूल केला तब्बल एवढ्या कोटींचा दंड

मुंबई | मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यातील काही जण तर तिकीटाविनाच प्रवास करतात. अशाच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून मोठा दंड मध्य रेल्वेने वसूल केला आहे.

मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. गेल्या 6 महिन्यात 12.47 लाख प्रकरणे शोधून त्यातुन रेल्वेने त्यातुन 71.25 कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे.  झोनल रेल्वेमधील मध्य रेल्वेने आतापर्यंतचा सर्वाधिक दंड वसूल केला आहे.

तब्बल दीड वर्ष रेल्वेने प्रवास करण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले त्यातच अनेक लोकांनी व राजकीय पक्षांनी कालांतराने याला विरोध दर्शवला. आता रेल्वे प्रवास काही प्रमाणात सुरळीत करण्यात आला असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, रेल्वेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत अनेक विविध नियमांचं उल्लंघन केलेली लोकंही आहेत. ज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणे, मास्क न वापरणे तसेच परवानगी नसताना रेल्वेने प्रवास करणे इत्यादींवरही मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा रेल्वे प्रशासनाने उचलल्याने तब्बल 71 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या

SBI नंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेला RBI चा दणका; केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं’, धनंजय मुंडेंनी सांगितली मन की बात

“शिवसेना सोडणाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करावा; संजय राऊतांच्या पत्राने राज्यात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More