मुंबई | राज्यात सध्या सगळीकडे पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगलाच पाऊस झाला आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने पुन्हा आगमन केलं आहे. मुंबईसह कोकणात देखील पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे हा महामार्ग बंद करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परीसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापुर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जुलै (सोमवार) पासून कोकणासह राज्याच्या अंतर्गत भागात आणि विदर्भाच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
धुळे, जळगाव आणि पालघर या जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यातील लोणार, मेहकर, सिंदखेजराजा परिसरात काल दुपारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात अजूनही खरीप पेरणी सुरु असून शेतकरी अनुकुल परिस्थितीत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.
थोडक्यात बातम्या –
बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“एकनाथ शिंदे मुळ शिवसेनेवर दावा करु शकत नाहीत”
मोठी बातमी! शिवसेनेतून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी
राज्यातील नवीन सरकारबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….
“तीन दशकातील मराठी रंगभूमीला व्यामीश्र संघर्षाची पार्श्वभूमी”
Comments are closed.