Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन….. ‘या’ भागामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता!

मुंबई | राज्यात सर्वत्र ठिकाणी पावसाचं आगमन होत असून पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आलाय.

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा 110, गडहिंग्लज 50, हर्सूल 30, खंडाळा बावडा, फलटण, विटा 20 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तर मराठवाड्यातील अहमदपूर, चाकून, केज, तुळजापूर, वडावणी याठिकाणी 20 मिमी पाऊस पडला.  विदर्भातील वर्धा 60, ब्रम्हपुरी, सेलू 30, देसाईगंज, हिंगणा, कुरखेडा 20 मिमी पावसाची नोंद झाली होती.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 23 व 24 जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25 जुलै रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 26 जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा आहे.

23 व 24 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 23 जुलैला उस्मानाबाद आणि 24 जुलै रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय  25 व 26 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ज्ञांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली मदत

महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नाराजीनाट्य; काँग्रेसच्या ‘या’ निर्णयामुळे शिवसेना-राष्ट्रवादी नाराज!

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

रिक्षात बसलेला तरुण पोलिसांना वाटला संशयास्पद; झडती घेतल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार!

भारतीय क्रिकेट संघाला 2 आठवडे ऑस्ट्रेलियामध्ये ठेवणार विलगीकरणात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या