Top News महाराष्ट्र

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात आणखी पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात मध्यम तसंच तुरळक स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा इशारा आहे. 21 ऑक्टोबरला दक्षिण कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.

तर 22 ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी केएस होसाळीकर यांच्या सांगण्यानुसार, “पुण्यातील स्थिती अधिक तीव्र असेल. रडारवर 10 किलोमीटरपेक्षा अधिक उंचीचे ढग पाहायला मिळाले असल्याने त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी.”

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव”ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”

3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात

…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या