बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबई | केरळमधून अवघ्या दोनच दिवसात महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मुंबईत पावसाचं आगमन झाल्यानंतर पहिल्या पावसातचं मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये अतिवृष्टीचा संकेत देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पावसानं अख्खा महाराष्ट्र ओलंचिंब केला होता. तर बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यानंतर राज्यात पाऊस काहीसा कमी झाला. मात्र, आजपासून पुढचे  5 दिवस राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अदांज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासह वीजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली

आज पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, वीजांच्या कडाक्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत घरातून बाहेर न जाण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, उद्या सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

कंगना रणौतला दिलासा नाहीच, हायकोर्टानं पुन्हा फटकारलं

“माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही”

“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावं”

अनोखं संशोधन! आसपास कोरोना रुग्ण असेल तर 15 मिनिटांत वाजणार अलार्म

मनसुख हिरेन प्रकरणातील स्फोटकांनी भरलेल्या कारचं लातूर कनेक्शन उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More