बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे जिल्हा परिषदेची दर्यादिली; एक दिवसाचा पगार देऊन कोरोनासाठी उभा केले ‘इतके’ कोटी

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा फेसबुक लाईव्हद्वारे केली होती. त्यावेळी त्यांनी एका गोष्टीवर भर दिला होता. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसाठी आरोग्य विभागावर ताण येत आहे. आरोग्य सुविधांची व्यवस्था करत आहोत पण, वाढत्या कोरोना रूग्णसंख्येसाठी डाॅक्टर कुठून आणायचे? राज्यात डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ग्रामीण भागात देखील तिच परिस्थिती असताना सर्वोत्तम उपचार करणारे डॉक्टर्स ग्रामीण भागात जात नाहीत, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावर एक तोडगा काढला आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन देऊन 1.97 कोटी रूपयांचा निधी उभारला आहे. या निधीतून ग्रामीण भागात कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्वोत्तम डॉक्टर्स नियुक्त करण्यासाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेने घेतलेला हा पुढाकार खुप मोलाचा असल्याचं म्हणतं त्यांनी याबद्दल जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकारी यांचे मनापासून आभार मानले आहेत.

कुशल मनुष्यबळ शोधणे आणि टिकवून ठेवणे ही सध्या एक मोठी बाधा आहे. सरकारी रुग्णालयात सेवा देणार्‍या डॉक्टरांना पगाराचे केंद्र व राज्य सरकारे निश्चित करत असताना स्थानिक डॉक्टरांना त्यांचे डॉक्टरांचे पगार वाढवण्याची शक्ती नाही, त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे, असं पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे.

ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी एमडी मेडिसीन अथवा बालरोगतज्ज्ञ अशा 30 डॉक्टरांना नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत दरमहा 75 हजार रूपये आणि कर्मचाऱ्यांच्या मदतनिधीतून 75 हजार रूपये असे दीड लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. याशिवाय 100 डॉक्टरांना दरमहा 90 हजार रुपये येण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या वेतनाच्या अतिरिक्त 30 हजार रुपये भत्ता समाविष्ट असेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

“गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?”

शिक्षकानं विद्यार्थिनीला दाखवला अश्लील व्हिडीओ, अत्यंत धक्कादायक प्रकारानंतर खळबळ

जिगरबाज! लहान मुलाला वाचवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं खुद्द रेल्वेमंत्र्यांनी केलं कौतुक; पाहा व्हिडीओ

“महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं तर बरं होईल”

अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ‘द फिशरमॅन्स डायरी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More