बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; तब्बल इतक्या दिवसांपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई | अश्लिल चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात पोलिसांच्या अटकेत असलेला बाॅलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी राज कुंद्रा यांना बोलवुन त्यांना काल अटक केली होती.

राज कुंद्राच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थोरोपे याला देखिल मुंबई पोलिसांनी रायगडमधुन अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा हा अश्लिल व पाॅर्न फिल्म बनवण्यासाठी पैसे पुरवत होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

उद्योजक राज कुंद्रा याच्यासह त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन याच्या पोलिस कोठडीत 23 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या समोरच्या अडचणी आणखी गडद होत चालल्याचं दिसुन येत आहे. भारतात अश्लिल चित्रपटाचं शुटींग करून ते वुई- ट्रान्सफरच्या माध्यमातुन युकेमध्ये पाठवण्यात आलं आहे.

या सर्व प्रकरणात राज कुंद्रा याची 8 ते 10 कोटींची गुंतवणुक असल्याचं पोलिसांकडुन प्रार्थमिकरित्या सांगण्यात आलं आहे. तसेच आता त्याच्या पोलिस कोठडीत वाढ झाल्याने या प्रकरणात आणखी कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

…अन् मला नग्न होण्यास सांगितलं, प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे कुंद्राच्या अडचणी वाढल्या

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबत WHOचा सावधानतेचा इशारा!

“शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे झारीतले शुक्राचार्य”

धक्कादायक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिलेला कोरोनाच्या दोन्ही व्हेरिएंटची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More