बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या ‘या’ 8 सूचना

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही सुचना केल्या असल्याचं सांगितलं. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार होते, परंतू कोरोनामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संभाषण झालं. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या सुचना वाचून दाखवल्या.

1.  छोट्या व्यापाऱ्यांना दुकान आठवड्यातून 2 ते 3  दिवस उघडं ठेवण्याची मुभा द्यावी. या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्याची परवानगी आहे पण, त्यांना ते विकण्याची सोय नाही. त्यांंमुळे त्यांना दुकान उघडं ठेवण्याची परवानगी द्यावी.

2. लोकांकडे पैसे असतील तर ते लोक पैसे देतील, जर त्यांच्याकडे पैसेच नसतील तर लोक कुठून पैसे देणार त्यामुळे बँकांची सक्तवसुली थांबवण्याबाबत बँकांना सुचना द्यावी.

3. लाॅकडाऊन काळात वीजबिल माफ करण्यात यावं. व्यवसायिकांना जीएसटीबाबत सवलत द्यावी देण्यात यावं याबाबतीत राज्याने केंद्र सरकारकडे बोलून घ्यावं.

4. कंत्राटी कामगारांना राज्यसरकारने कामाला घेतलं होतं. पण नंतर त्यांना काढून टाकलं होतं. पुन्हा त्यांच्यावर तिच परिस्थिती येऊ नये यासाठी जर जमलंच तर या कामगारांना कायम करावं.
5. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना आठवड्यातून 2-3 वेळा काम करता यावं यासाठी परवानगी द्यावी.
6. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना सरावाची गरज असते. त्यांच्या सरावासाठी खेळाडूंना परवानगी द्यावी आणि याचबरोबर त्यांना काही सवलती देखील द्याव्यात.
7. शेतकऱ्यांना राज्यसरकारने हमीभाव द्यावा. शेतकरी कोसळला तर मोठं संकट आपल्यावर येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव देणं गरजेचं आहे.
8. शाळाकडून फी आकारली जात आहे. मुलं शाळेत जातच नसतील तर फी कशाबद्दल घेता. मुलांच्या आणि पालकांच्या मानसिकतेचा देखील विचार करावा लागेल.
अशा 8 मुद्यावर राज ठाकरे यांनी भर दिला आहे. या सुचनांवर सरकारने विचार करावा अशा त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या सुचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-

राज्यात खुनाला उत्तर खुनाने असं सुरु झालं तर… राज ठाकरेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

‘किंबहुना… किंबहुना वापरलं तर चालेल ना?’; राज ठाकरेंकडुन पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची फिरकी

“दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात टाका”

“इतकंही वाहून जाऊ नका की, शरद पवार माझ्या वडिलांसारखे आहेत म्हणण्याची वेळ येईल”

मोठी बातमी! राष्ट्रपतींकडून न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More