महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

वाद भाजप-शिवसेेनेत अन् राज ठाकरेंचं ‘ते’ व्यंगचित्र व्हायरल!

मुंबई | युतीत सत्तेच्या वाटपावरून वाद आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे. तर ते देण्यासाठी भाजप अनुकूल नाहीये. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं एक व्यगंचित्र व्हायरल होतंय. जे युतीवर भाष्य करतंय.

सध्या युतीत वाद सुरू आहेत. राज यांनी काही दिवसांपूर्वी याच अनुषंगाने एक व्यंगचित्र काढलं होतं. या व्यंगचित्रात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक आहे. ती अवनी वाघीणीला मारल्याचं दर्शवते. त्यांच्या बाजूला सुधीर मुनगंटीवार त्यांच्यासोबत दिसत आहेत. तर मागे उद्धव ठाकरे आहेत.

दुसरीकडच्या चित्रात महाराष्ट्र नावाचा वाघ येतो. आणि उद्धव ठाकरे,देवेंद्र फडणवीस यांना गिळंकृत करताना दिसतो आहे. त्यावेळी मुनगंटीवार झाडावर आहेत. 

यवतमाळमधल्या नरभक्षक बनलेल्या अवनी वाघीनीला गोळ्या घालून मारलं होतं. त्यावेळी भाजप आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी राज यांनी एक व्यंगचित्र काढलं होतं. त्याचाच संदर्भ सध्याच्या परिस्थितीशी लावत नेटकरी हे व्यंगचित्र फॉरवर्ड करत आहेत.

राज ठाकरे यांचं व्हायरल होत असलेलं व्यंगचित्र-

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 


 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या