बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ST Strike | “लोकांवर अरेरावी करण्यासाठी हे राज्य तुमच्या हातात दिलं नाही”

नाशिक | राज्यात गेल्या अनेक आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरूआहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप  आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दिलेल्या अल्टिमेटमनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘सध्या एसटीचा विषय आपण नीट पाहणं आवश्यक आहे. जी माहिती मला मिळाली आहे त्याप्रमाणे चुकीचं काही आहे असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत’, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी हे राज्य दिलेलं नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर बोलणाऱ्यांना भ्रष्टाचारातून दोन दिवस घरी पैसा नाही आला तर जीव कासाविस होतो, असा घणाघातही राज ठाकरेंनी केला आहे.

कर्मचाऱ्यांना चार-चार महिने पगार नाही. दिवाळी पगाराविना गेली, मग कसं होणार?, अशी टीका राज ठाकरेंनी केली. कर्मचाऱ्यांवर अशी परिस्थिती असताना तुम्ही कसली आरेरावीची भाषा करताय?, या शब्दात राज ठाकरेंनी सुनावलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्रजी पवार साहेबांवर टीका करतात आणि चमत्कार घडतात, 2024 मध्येही..”

एसटी संप: “आता माघार नाही, जी कारवाई करायची ती करा”

किरीट सोमय्या लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट; ‘हे’ घोटाळे करणार उघड

“…म्हणून ‘या’ मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय”

“शरद पवारांचा पक्ष बनला तेव्हापासूनच ‘ते’ पंतप्रधान पदाचं स्वप्न बघत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More