बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटलांना 250 जागांचा अंदाज येतो, पावसाचा येत नाही का???”

मुंबई | चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या 250 जागांचा अंदाज येतो मग पावसाचा अंदाज येत नाही का??, असा प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील आणि सरकारवर टीका केली आहे.

सरकारला एवढ्या पावसाचा अंदाज कसा येईल? असा प्रश्न कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सातत्याने उपस्थित करत आहेत. त्यावर राज ठाकरेंनी टीका केली आहे.

सांगली- कोल्हापूरात सध्या गंभीर पुरस्थिती आहे. मात्र सरकार परिस्थितीचं गांभीर्य न पाहता भाजपकडून नको तिथं जाहिरातबाजी केली जातीयं. सरकारला अजिबात संवेदना राहिलेल्या नाहीत, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आलेल्या अन्नधान्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर्स चिटकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर राज यांनी आज पत्रकार परिषदेत टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ब्रह्मनाळ दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

-सरकारने निर्लज्जपणाचा कळस केलाय- अशोक चव्हाण

-महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरे यांची मागणी

-अखेर राज्य सरकारनं तो वादग्रस्त निर्णय बदलला; आता पूरग्रस्तांना मिळणार रोख मदत!

-#सेल्फिशसरकार | शोबाजीपायी लोकांना उपाशी माराल- धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More