पुणे महाराष्ट्र

नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन

पुणे |  नापास होण्याचा आणि आयुष्याचा कसलाही संबंध नसतो. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत कि जे शिक्षणात मागे राहून देखील त्यांनी आपल्या आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या नोकरी महोत्सवात तरूणांना मार्गदर्शन केलं.

मनसेच्या वतीने पुण्यातल्या हडपसर येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी तरूणांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतात. फक्त नोकरीच्या मागे लागू नका, स्वत:मधील प्रतिमा शोधा आणि कोणत्याही कामाला कमी मानू नका, असं राज म्हणाले.

राज यांनी त्यांच्या लहानपणीचा किस्सा सांगत कोण व्यक्ती किती पैसे कमावू शकतो… काही सांगू शकत नाही. म्हणून टँलेंट ओळखायला शिका, असं म्हटले.

महत्वाच्या बातम्या

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीली सरपंचांना पत्रं; केलं हे आवाहन

-प्रकाश मेहतांना भ्रष्टाचाराचं प्रकरण भोवलं; अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बसवलं

-मोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे

-“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”

-गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या