मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे समाजसेवक अण्णा हजारेंच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीकडे रवाना झाले आहेत.
लोकपाल, लोकायुक्त, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा गेल्या 5 दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत.
आज गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आता राज ठाकरेही अण्णांना भेटीसाठी राळेगणसिद्धीला रवाना झाले आहेत.
दरम्यान, अण्णांच्या जीवाशी खेळ नको, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला.
महत्वाच्या बातम्या-
–…तर मी माझा ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करणार- अण्णा हजारे
-सूरज चव्हाण, रविकांत वर्पे आणि मेहबुब शेख युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत
–मुख्यमंत्र्यांनाही अण्णांच्या तब्येतीची काळजी- गिरीश महाजन
-“निवडणुकीसाठी एकत्र येऊ की नाही, हे आताच सांगता येणार नाही”
–नागपुरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध श्रीहरी अणे लढत?