बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरेंनी कारकूनाला ‘सामना’चं संपादक बनवलंय, हे त्यांनी विसरू नये”

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे गट हट्टाला पेटला असून ते माघार घेण्यास तयार नाहीत. अशात दुसरीकडे शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ठिकठिकाणी सभा आणि मेळाव्यांचं आयोजन करत आहेत. त्यात ते पलायन करुन गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहेत.

यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देेशपांडेनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरीवाला, भाजी विकणारा, वॉचमन म्हणणाऱ्या लोकांनी हे विसरु नये, ते स्वत: लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राज साहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवलं, असं ते म्हणालेत.

दहीसर येथील आयोजीत सभेत संजय राऊत बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांवर तोफ डागली होती. आमदार गुलाब पाटील हे पानटपरी चालवायचं त्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केलं. आम्ही पुन्हा त्यांना पानपट्टीवर पाठवू. संदिपान भुमरे हे पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होते. शिवसेनेने त्यांना तिकीट देऊन निवडून आणलं. मुंबईला पहिल्यांदा आल्यावर त्यांनी हॉटेलमध्ये जमिनीवर बसून वडासांभार खाल्ले होते. आज ते कॅबिनेट मंत्री झाले. प्रकाश सुर्वे भाजीविक्रते होते त्यांना शिवसेनेने मोठे केले. अशा शब्दात त्यांनी जुन्या आठवणी सांगत त्यांनी आमदारांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकारावर अजून भाष्य केलं नाही. शिंदे गट मनसेत विलीन होणार का? हे आगामी काळात पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

राज्यपाल ॲक्शन मोडमध्ये!, पत्र लिहून मागवली ‘ही’ मोठी माहिती

“जनामनाची लाज असती तर राजीनामा दिला असता…”

राज्यात आज काहीतरी होण्याची शक्यता, भाजपने आमदारांना पाठवला ‘हा’ निरोप

सकाळी स्पा, मसाज, जीम; तर रात्री… बंडखोर आमदारांचा दिनक्रम ऐकून चकीत व्हाल!

काळजी घ्या! दारू नाही तर ‘या’ पदार्थांमुळेही होऊ शकतं लिव्हर खराब

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More