बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही फक्त काळजी घ्या, त्या फेरीवाल्याचं काय ते आम्ही बघू”

मुंंबई | ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर त्यांची दोन बोटं तूटली आहेत. पिंपळेंवर ठाण्यातील ज्युपीटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंगळे यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. पिंगळे या कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना पिंगळे यांची अमरजीत यादव यांनी दोन बोट छाटली होती. तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा, त्या फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू, असं राज ठाकरे म्हणाले.

फेरीवाल्यांच्या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.  त्या परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरायलाच हवी. ज्या दिवशी तो फेरीवाला जेलमधून बाहेर येईल. त्याच दिवशी त्याला ठोकणार, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोमवारी सांयकाळी कल्पिता पिंगळे यांच्याबरोबरच त्यांचा सुरक्षा रक्षक पालवे यांच्यावर ही फेरीवाल्यांनी हल्ला केला होता.  त्यानंतर या दोघांनाही ठाण्यातील जुपीटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  अमरजीत यादव या फेरीवाल्याला पोलिसांनी अटक केली आहे. यादव यांच्यावर तीन वर्षापूर्वीही अशा प्रकाराच्या गुन्ह्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल

“ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या”

विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले…; पाहा व्हिडीओ

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलीनच्या चौकशीत धक्कादायक गोष्टींचा खुलासा

“नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची देवाने बनवलेली अप्रतिम जोडी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More