बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरे यांची मागणी

मुंबई |  सांगली कोल्हापुरात महापूराने अनेकांची आयुष्य देशोधडीला लागलीयेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पुढे ढकला आणि कोल्हापूर-सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. आचारसंहिता जाहीर झाली की मग मदत मिळणार नाही. मग सरकार हात वर करणार… जबाबदारी झटकणार… या सरकारला संवेदनशीलता राहिलेली नाही, अशी जोरदार टीका राज यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणतात, पावसाचा सरकारला अंदाज आला नाही. तुम्हाला 250 जागांचा कसा अंदाज येतो???, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

भाजपला सत्तेचा माज आल्याने जनतेशी त्यांना काहीही देणंघेणं नाही, असंही राज म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अखेर राज्य सरकारनं तो वादग्रस्त निर्णय बदलला; आता पूरग्रस्तांना मिळणार रोख मदत!

-#सेल्फिशसरकार | शोबाजीपायी लोकांना उपाशी माराल- धनंजय मुंडे

-धक्कादायक!!! दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर मुख्यमंत्री आणि आमदाराचं ब्रँडिंग

-आता अंत्ययात्राही थांबून काढा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत- जितेंद्र आव्हाड

-…तर त्याला शासनच जबाबदार आहे- धैर्यशील माने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More