बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सत्ताधारी माणसं दिवसाढवळ्या खून करत आहेत, राज ठाकरेंनी घेतलं राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं नाव

मुंबई | मनसे नेते जमील शेख हत्या प्रकरणावर राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी माणसं दिवसाढवळ्या खून करत असल्याचा आरोप केला, तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचं नावही त्यांनी या प्रकरणात घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

मनसे नेत्याच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश लखनौतून स्पेशल टास्क फोर्सनं एक प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांचं नाव घेण्यात आलं आहे. सुपारी देऊन हत्या केल्याचा उल्लेख या प्रेसनोटमध्ये आहे. २ लाख रुपये मला मिळाले, मात्र ओसामाने ही डील कितीला केली हे मला माहीत नाही असं या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपीनं म्हटल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांचा या प्रेसनोटमध्ये उल्लेख असल्यानं राज ठाकरे चांगलेच खवळले होते. सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करत आहेत. बिल्डर सूरज परमार यांच्या सुसाईड नोटमध्येही याच नजीब मुल्लाचं नाव होतं, मात्र ती केस रफदफा केली गेली. आता या प्रकरणात राज्य सरकार काय करतंय याची मी वाट पाहतोय, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीला अशी मंडळी पक्षात सांभाळायची असतील तर आमचे हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने असं सुरु झालं तर सुसंस्कृत महाराष्ट्रात हे चित्र चांगलं दिसणार नाही. या गोष्टीला वेळीच आवर घाला. नजीम मुल्लाला अटक करुन त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, यासाठी मी लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहे, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! राष्ट्रपतींकडून न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI टीम आज मुंबईत येणार

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड

“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More