‘पुलवामा तुम्ही घडवला की काय? राज ठाकरेंना संशय

सातारा  |  5 एप्रिलला टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही? ह्यावरून आता असं वाटतंय की पुलवामा ठरवून घडवलं गेलं का? अशी शंका राज ठाकरेंनी साताऱ्याच्या सभेत बोलताना व्यक्त केली.

250 सोडा हो… फक्त 10 लोकं जरी मारली गेली असती तरी आपला अभिनंदन परत आला नसता, असा राज यांनी पुनरूच्चार केला.

आपले ४० जवान हकनाक मारले गेले. त्यांची मोदींना काहीच किंमत नाही, असं म्हणत राज यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान दुखा:त हवा. टेलिग्राफ वृत्तपत्राने नरेंद्र मोदींचे 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी वेगवेगळ्या डिझायनर कपड्यांमधले फोटो छापलेत, हे काय होतं नेमकं???, असं म्हणत राज यांनी मोदींच्या जवानांविषयीच्या भावनांवर शंका घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

-मी विनंती करतो बेसावध राहू नका, मोदी-शहा तुमचं जगणं हराम करतील- राज ठाकरे

-शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय- राज ठाकरे

-थोड्याच वेळात राज ठाकरे म्हणणार… ऐ लाव रे तो व्हीडिओ!

-पुण्यात काँग्रेस बॅकफूटवर?; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही

-‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे