महाराष्ट्र मुंबई

मैं हूँ ना…. चिंता करू नकोस, राज ठाकरेंचा अविनाश जाधवांना खास निरोप

मुंबई | मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर मनसेमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे बाळा नांदगावकर यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नांदगावकर यांच्याजवळ अविनाथ जाधव यांच्यासाठी खास निरोप पाठवला आहे.

काल अविनाशला अटक झाली व तडीपारची नोटीस देण्यात आली. त्या अनुषंगाने राजसाहेबांकडे गेलो. तिथे अविनाश विषयी सखोल चर्चा झाली व साहेबांच्या निर्देशानुसार त्यांचा निरोप घेऊन ठाणे गाठले, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. मैं हूँ ना…. चिंता करू नकोस, असा स्पेशल निरोप राज यांनी दिल्याचं नांदगावकरांनी सांगितलं.

राजकारणात विविध पक्ष असतात पण मनसे परिवार आहे, आणि परिवारात कोणी अडचणीत असल्यास सर्व परिवारच ठामपणे त्याच्या मागे आपली पूर्ण ताकद लावून उभा असतो आणि आमचे परिवार प्रमुख राजसाहेब हे सर्व कार्यकर्त्यांवर अक्षरशः जिवापाड प्रेम करतात अन त्यांना जपतात. अविनाशबद्दल तर ही तळमळ अजून तीव्रतेने मी स्वतः आज अनुभवली. तेथून निघतांना बाकीच्या चर्चेबरोबरच साहेबांनी एकच निरोप अविनाशला दयायला सांगितला, अविनाश, मै हू ना! यात सगळेच आले, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली.

ठाण्याला जाऊन अविनाशशी भेट झाली. त्याला ठामपणे आम्ही सर्व सोबत आहोत व साहेबांचा विशेष संदेश सांगितला. राजसाहेबांच्या तीन शब्दांत किती ताकद आहे ना… कार्यकर्त्यांमध्ये याच तीन शब्दांनी 100 हत्तींचे बळ येते. अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा, असं नांदगावकरांनी सरकारला सांगितलं.

 

महत्त्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनमध्ये रॉयल एनफील्डची कमाल, ग्राहकांच्या पसंतीला बुलेटची धमाल…!

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवं नाट्य, तपासासाठी आलेले पाटण्याचे SP….

खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या