मुंबई | औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा का नामकरण केलं नाही?, असा सवाल राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला विचारला आहे.
सत्ता होती तेव्हा यांना कुणी रोखलं होतं? आज कसलं राजकारण करत आहात?, असा सवाल करत राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेना नेत्यांवर टीका केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा आणि जनतेची फसवणूक करायची, हेच चालत आलं आहे. पण संभाजीनगरची जनता हुशार आहे. ती योग्य निर्णय घेईल आणि शिवसेना-भाजपचा योग्य समाचार घेईल, असं राज ठाकरे म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
कोण आहे ती बाई? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?- राज ठाकरे
शेतकरी आंदोलनावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं, म्हणाले…
‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ
इथं कुणीच मास्क घातलेलं दिसत नाही, बाबांनो… अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला