डीएसकेंना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात!

पुणे | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी गुंतवणूकदारांची देणी थकवल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत डीएसकेंना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात येणार आहेत आणि डीएसकेंच्या गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. 

पुण्यातील बीएमसीसी रोडवरील दराडे हॉलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. तसेच त्यानंतर लॉ कॉलेज रोडवरील राज महलमध्ये ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. 

दरम्यान, ‘थोडक्यात’नं नुकताच पत्रकार श्रीरंग खरे यांचा लेख प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये मराठी नेते डीएसकेंच्या पाठिशी उभे राहात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.