महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंनाही डिसले गुरुजींचा अभिमान, अशा शब्दात केलं कौतुक!

मुंबई | युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना मिळाला.

जगभरातील 140 देशातील 12 हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.

रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं आहे.

युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन. तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय, अशा शब्दांत राज ठाकरेंनी रणजितसिंह डिसले यांचं कौतुक केलं आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

भारताला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

अखेर मोदी सरकार नमलं; शेतकऱ्यांना दिली ‘ही’ परवानगी!

निलेश राणेंचं आक्षेपार्ह ट्विट; महाविकास आघाडीतील पक्षांना दिली ‘ही’ शिवी!

“ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्रपक्षांनीच रचला सापळा”

“तारक मेहता का उल्टा चष्मा” मालिकेतील महत्त्वाच्या व्यक्तीनं केली आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या