बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रत्येकाशी जुळवून घेण्याची सुषमा स्वराज यांची वृत्ती कायम लक्षात राहील”

मुंबई | माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाबाबत सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात फेसबूक पोस्ट केली आहे.

विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुषमाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो, असं म्हणत त्यांनीही सुषमा स्वराज यांना आदरांजली दिली आहे.

दरम्यान, सुषमा स्वराज यांना रात्री 9 च्या सुमारास एम्समध्ये दाखल केलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची एक वेगळीच ओळख होती.

महत्वाच्या बातम्या-

-“तुम्ही मंगळावर अडकलात तरी भारतीय दुतवास तुमच्या मदतीसाठी धावून येईल”

-आई…अशी कशी निघून गेलीस!; सुषमा स्वराज यांचा ‘तो’ व्हीडिओ होतोय व्हायरल

-मी माझी मोठी बहिण गमावली; नितीन गडकरी भावूक

-“मला सुषमा स्वराज यांनी 1 रुपये फी घेण्यासाठी बोलवलं होतं. पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More