बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल देशमुख ईडीला येडं समजतात, राज्याचा ‘झू’ करून टाकलाय”

नाशिक | राज्यात आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा गड काबीज करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरेंनी संघटनेच्या आढाव्यावर चांगलाच जोर दिल्याचं पाहायला मिळत आहे. आज नाशिकमध्ये राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

राज्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत आरोप प्रत्यारोपात मग्न आहेत. राज्यात काय चालू आहे मला काही कळतचं नाही. किती वैयक्तिक पातळीवर जायचं आणि काय बोलायचं. साप काय बेडूक काय सगळा झू करून टाकलाय. कानफटात मारू वगैरे, कुठल्या पदावर आपण बसलोय आणि काय बोलतोय, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या चौकशीस टाळाटाळ करत असल्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, कुठल्या गोष्टीची राज्यात भीतीच उरलेली नाही. माजी गृहमंत्र्यांना ईडी चौकशीसाठी बोलावते, ते जात नाहीत. बहुधा ते ईडीला येडा समजतात. सरकारी यंत्रणांनाच तुम्ही दुय्यम मानत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही, अशी खोचक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.

दरम्यान,  माझे विनोद पचतात, लोकांचे विनोद पचत नाहीत आणि लोकांच्या अंगाशी येतात. सगळे माझ्यासारखे विनोद करायला जातात आणि फसतात, असा चिमटा सुद्धा राज ठाकरेंनी विरोधकांना घेतला आहे.

 

थोडक्यात बातम्या –

मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं- किशोरी पेडणेकर

”आमचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास, ते आमचा मान ठेवतील”

पुन्हा हादरली मुंबई! अल्पवयीन मुलीवर 30 जणांकडून सामूहिक बलात्कार

राज्यातील घोटाळे बाहेर काढणार म्हणणाऱ्या दरेकरांना अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“लोकांनी एकाचवेळी दोन ते तीन वेळा बटनं का दाबायची?”; राज ठाकरेंचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More