बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नमस्कार, राज बोलतोय….’; मुख्यमंत्र्यांना मदतीची मागणी करणाऱ्या शिक्षिकेला राज ठाकरेंचा फोन

मुंबई | तौक्ते वादळामुळे कोकणासह मुंबई उपनगरातील काही भागात वादळाचा फटका बसला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिकवणाऱ्या शिक्षिका सुमन लक्ष्मीकांत रणदिवे यांच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालं आहे. वसईमधील न्यू लाइफ फाऊंडेशन या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं होतं. यानंतर सुमन रणदिवे यांनी उद्धव ठाकरे भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रणदिवे यांच्याशी फोनवर संवाद साधला.

वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर, अशी विनंती यावेळी सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं.

कुंदा कशी आहे?, अशी विचारणा रणदिवेंनी केली. त्यावर आई बरी आहे असं उत्तर राज यांनी दिलं. तू मध्यंतरी इथे आला होतास. पण आपली भेट झाली नाही. एकदा मला भेटायला ये ना, असं म्हणत रणदिवेंनी राज यांच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लॉकडाऊन संपू दे. नक्की भेटायला येतो, असा शब्द राज ठाकरेंनी दिला.

दरम्यान, चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं आहे. छप्पर उडालं, सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवलं होतं. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी आर्त हाक शिक्षिका सुमन यांनी त्यांच्या मुख्यमंत्री विद्यार्थ्याला लगावली होती.

थोडक्यात बातम्या- 

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“लाॅकडाऊन आपल्याला हळुहळु उघडावा लागेल, लगेचच सर्व काही उघडणार नाही”

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More