बारामतीच्या न्यायालयाकडून राज ठाकरे यांना दिलासा!

बारामती | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. 2008 मध्ये झालेल्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलनाच्या खटल्यातून राज ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं आहे.

2008 साली मनसेच्यावतीने बारामतीत आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी ट्रकची तोडफोड केली होती. राज ठाकरेेंच्या चिथावणीखोर भाषणामुळेच हा प्रकार घडला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

सदर खटल्यात 2013 मध्ये राज ठाकरे यांचे नाव प्रथम वर्ग न्यायालयाने या खटल्यातून वगळले होते. तसंच राज ठाकरेंनी बारामतीत येऊन या खटल्यातून जामीनही घेतला होता. मात्र सरकारकडून या निर्णयाविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने हा पुनर्विचार अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राज ठाकरेंना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-विरेंद्र सेहवागनं महिला क्रिकेटसंघाला दिला ‘हा’ कानमंत्र

-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीसाठी करतोय असा प्रचार

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज दाखल