Loading...

राज ठाकरे आज ईडीपुढे हजर होणार; पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मनसेकडून ठाणे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. तसेच अनेक कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर जाणार होते. पण राज ठाकरे यांच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला आहे.

Loading...

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असं कोणतंही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपला… पी. चिदंबरम यांना अटक!

राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो मग थोरातांचा का नाही??- सुजय विखे

पीचिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत मौन सोडलंम्हणाले

Loading...

राजकारणात आता शरद पवारांची भिती वाटत नाही– उद्धव ठाकरे

-5 वर्ष कचाकचा भांडता आणि नंतर युती झाली असं सांगता…; अमोल कोल्हेंचा सेनाभाजपवरहल्लाबोल

Loading...