समृद्धी महामार्ग आंदोलनात उतरा, प्रकल्पग्रस्तांची राज ठाकरेंना विनंती!

नाशिक | समृद्धी महामार्ग विरोधातील शेतकरी राज ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी विनंती करणार आहेत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत

सरकार कायदा पायदळी तुडवून समृद्धी महामार्गासाठी जमीन हस्तांतरण करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलनही केली होती. आता राज ठाकरेंनी त्या आंदोलनात उतरावं अशी मागणी शेतकरी कऱणार आहेत.

दरम्यान, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी परवानगीशिवाय जमीन संपादित होत असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे.