आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार!

मुंबई | उत्तर भारतीयांवर कायमच टीका करणारे राज ठाकरे आता चक्क त्यांच्याच मंचावर दिसणार आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

डिसेंबरमध्ये होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आलं होतं. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे.

2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख वक्ते असणार आहेत.

दरम्यान, मनसेची स्थापना आणि त्यानंतर सातत्याने राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय लोंढ्यांवर टीका केली आहे, तसेच त्यांच्या पक्षाने उत्तर भारतीयांना मारहाण देखील केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम

-मंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक

-पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र शहीद

-केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन

-शेवटच्या चेंडूवर भारताचा अत्यंत थरारक विजय