बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्वा रे पठ्ठ्या… मराठा आरक्षण जाहीर झाल्यापासून १३ हजार जणांना जात प्रमाणपत्रं वाटली!

पुणे | सकल मराठा समाज बार्शी व राजाभाऊ राऊत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने गेल्या महिना भरापासून सुरू असलेल्या मराठा समाजातील विदयार्थ्यांसाठी मोफत एसईबीसी जात प्रमाणपत्र शिबीराच्या अंतर्गत 13 हजार जणांना जात प्रमाणपत्रं मिळाली आहे.

राजाभाऊ राऊत यांनी आयोजित केलेल्या शिबीरात १३४५४ जणांनी जात प्रमाणपत्रासाठी नोंदणी करून या शिबीराचा लाभ घेतला. या शिबीराचा अनेक विदयार्थ्यांना फायदा झाला आहे. शासनाने मराठा समाजाला दिलेले विविध लाभ आणि सवलती त्याआधारे विदयार्थ्यांना मिळतील.

विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करावे. काळ बदलेला आहे. बदललेल्या काळाबरोबर आपणही बदलावं आणि नोकरी व्यवसायात नाव कमवावं, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली.

दरम्यान, समाजासाठी असलेल्या उत्तरदायीत्वातूनच हा उपक्रम राबविण्यात आल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीनं पुण्यातील नळस्टाॅप चौकाचं नाव बदललं!

-“सांगली- कोल्हापूरात अत्यंत गंभीर L3 दर्जाची आपत्ती घोषित करा”

-‘शाहू’नगरीतला मुस्लिम समाज बकरी न कापता देणार पूरग्रस्तांना आर्थिक मदत!

-“जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती, म्हणून मी पूरग्रस्त भागात गेलो नाही”

-कोण काय करतो आम्हाला माहित नाही…. आमची लोकं काम करतात- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More