बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील”

मुंबई | वेळ आली तर सेनाभवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं. यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. यानंतर शिवसेेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली आहे.

तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, असं म्हणत राजन साळवींनी प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिलंय. मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रसाद लाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीचं उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत भाजपला भुईसपाट करून देईल. तसेच वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. एवढी तुमची आमची भीती की ह्यांना असं वाटतं हे माहिममध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुया, असं प्रसाद लाड म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

मन सुन्न करणारी घटना; आजीच्या दशक्रिया विधीदिवशीच नातवांचाही मृत्यू!

“देशातील हर एक चौथा मुसलमान भिकारी आहे , ही माहिती अस्वस्थ करणारी”

“अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; झिका विषाणूचा पहिला रूग्ण आढळला ‘या’ शहरात

…वेळ आली तर सेनाभवन फोडू- प्रसाद लाड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More