अहमदनगर | मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की या रुग्णालयाची गरज कुणालाच लागू नये, असं प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कार्यकारी संचालक राजेंद्र विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ‘कोविड १९’ रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांच्या पुढाकारानं प्रवरा मेडिकल ट्रस्टनं अवघ्या ६ दिवसात कोरोनासाठीचं रुग्णालय सुसज्ज केलं आहे. यावेळी प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. वाय. एम. जयराज, मेडीसीन विभाग प्रमुख डाॅ सतिश महाजन उपस्थित होते.
‘कोविड १९‘ हे रुग्णालय सामाजिक बांधिलकी म्हणून सुरु केले आहे. येणाऱ्या संकटाची चाहूल व या भागातील नागरिकांच्या काळजीपोटी आम्ही हे १०० बेडचे रुग्णालय उभारले आहे, असं डाॅ. राजेंद्र विखे पाटील यावेळी म्हणाले.
हे रुग्णालय चालवण्यासाठी मोठा खर्च आहे, त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढं यावं तसेच राज्य सरकारने तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, असं आवाहनही राजेंद्र विखे यांनी यावेळी केलं. स्थानिक लोकसभा सदस्य असलेल्या व्यक्तीने सक्रीय मदत केली पाहिजे. फक्त आश्वासन नको, असा टोलाही त्यांनी यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांना लगावला.
ट्रेंडिंग बातम्या-
क्वारंनटाईन सांगितलं तर तिथेही गप्प नाही… नमाज पठण सुरूच
घराबाहेर पडणारे दवाखान्यात अन् नियम मोडणारे यापुढे तुरूंगात दिसतील- अजित पवार
महत्वाच्या बातम्या-
“अल्लाहने आजार दिला असेल तर कुठलाही डाॅक्टर किंवा औषध आपल्याला वाचवू शकणार नाही”
रॅपिड टेस्टिंगची मान्यता मिळालीये, आता 5 मिनिटांत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळणार- आरोग्यमंत्री
लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांनी लगेच घराबाहेर पडू नये- पंतप्रधान मोदी
Comments are closed.